जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली सर्वपक्षीय पॅनल बाबत सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा अखेर संपुष्टात आलेली आहे. काँग्रेसने भाजप सोबत निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे अखेर सर्वपक्षीय पॅनलवर पाणी फेरले गेले आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजिंठा गेस्ट हाऊस येथे भाजपची मॅरेथॉन बैठक सुरू आहे. भाजपने जिल्हा बँक निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्या नंतर माजी मंत्री गिरीश महाजन विरुद्ध माजी मंत्री एकनाथराव खडसे असा संघर्ष पेटताना दिसणार आहे.
ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यां सोबत माजी मंत्री गिरीश महाजन,खा.रक्षा खडसे,खा. उन्मेष पाटील,आ. मंगेश चव्हाण,आ. राजुमामा भोळे,माजी आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत झालेंल्या बैठकी नंतर खुद्द माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा बैठक घेतली आहे. या बैठकीत जिल्हा बँकेच्या गटा नुसार असलेले मतदार संघ तसेच विरोधी पक्षाकडून उभे राहणारे उमेदवार याबाबाबत मंथन भाजप नेत्यांचे सुरू आहे. ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राशी परिचित चेहेऱ्या ना संधी देण्यात येणार आहे. जागेची चाचपणी करून योग्य उमेदवार दिला जाईल. भाजप कडून मतदारांच्या दृष्टीने मतदारांशी मजबूत नाळ असलेला उमेदवार देण्याच्या तयारी भाजपने चालवली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय नंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे त्यासाठी साम दाम दंड भेद या कृतीचा प्रत्यय निवडणुकीदरम्यान येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक वर्तुळात सध्या तरी राष्ट्रवादीचे पारडे जड असताना भाजपला मोठे आवाहन पेलावे लागणार आहे.