जळगाव राजमुद्रा दर्पण |जिल्ह्यातील कोमजलेल्या कॉग्रेस मध्ये गटबाजी कीड लागली यामुळे पक्ष पिछाडीवर गेला ठराविक पदाधिकाऱ्यांची मक्तेदारी असलेल्या कॉग्रेस विजनवासात गेले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असायची निवडणुकांमध्ये उमेदवारांचा अभाव तसेच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा अभाव यामुळे काँग्रेस संघटन ढासळलेले होते, मात्र नुकतेची राज्याच्या कॉग्रेस कमेटीची धुरा माजी विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडे आल्या नंतर संपूर्ण राज्यात संघटनात्मक मोठा बदल करण्यात आला आहे. यांचे पडसाद सर्व पक्षीय पॅनलचा निर्णय घेताना जिल्हा बँक निवडणुकांमध्ये उमटला आहे.
याचे पडसाद जिल्हा बँक निवडणुकीच्या सर्व पक्षीय पॅनल मध्ये उमटले आहे. जिल्हा कॉग्रेसने थेट भाजप सोबत निवडणुक लढण्यास नकार दिला यामुळे सर्व पक्षीय पॅनल उभा प्लॅन फसला यामुळे चक्क राजकीय वर्चस्व असलेल्या भाजपला अल्पमतातील कॉग्रेसने अखेर कामाला लावले आहे. भाजपला अखेर जिल्हा बँकेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची वेळ आली आहे. यासाठी भाजप नेते आ. गिरीश महाजन यांना कंबर कसावी लागणार आहे.
जिल्ह्यात कॉग्रेसचे रावेर विधानसभा क्षेत्रात एकच आमदार एक आमदार आहे. सहकार क्षेत्रात देखील कॉग्रेसचे काही प्रमाणात ग्रामीण भागात वलय आहे. मात्र गटबाजी मुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांना गेल्या काळातील निवडणुकांमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले आहे.
मात्र पुन्हा एकदा काँग्रेसने जिल्ह्यात उभारणी करता कंबर कसली आहे. जिल्हा बँक निवडणुका थेट स्वबळावर लढण्याची घोषणा कॉग्रेसने केली आहे. कायम राजकीय कोंडीत अडकणाऱ्या कॉग्रेसने प्रस्थापित राजकीय पक्षाची कोंडी केली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत अल्पमतात असणाऱ्या कॉग्रेसने थेट भाजप सोबत निवडणुका न लढण्याची घोषणा केल्याने राजकीय पटलावर कॉग्रेसने प्रभावी संकेत दिले आहे. या विषयाची जोरदार चर्चा राजकारणात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सर्व पक्षीय पॅनल व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक वेळा भाजप,कॉग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबत जिल्हा बँकेत सर्व पक्षीय पॅनल बाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये जागा देखील ठरवण्यात आल्या मात्र कमी जागा देण्यात येत असल्याचा कारणावरून व पॅनल मध्ये जरी असले तरी पाहिजे तेवढे उमेदवारी बाबत विश्वासात घेतले जात नसल्याची कॉग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे.
भाजप सोबत निवडणुक लढणार नसल्याचा पवित्रा कॉग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी जाहीर केला आहे. मात्र महाविकास आघाडी जिल्हा बँक निवडणूक लढवत असल्यास आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे कॉग्रेस मधील राजकीय सूत्रा कडून समजते.