मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबईत दुकानं तसेच हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिलेली आहे. तर मुंबई वगळता इतर शहरातील दुकाने तसेच हॉटेल बाबत स्थानिक पातळीवर प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
7 ऑक्टोबर रोजी अद्याप पर्यत एकही रुग्ण दगावलेला नाही यामुळे राज्य पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने, हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याचा हा निर्णय फक्त मुंबई शहराच्या हद्दीपुरताच मर्यादित राहील असे आदेश देण्यात आले आहे. तर बाकीच्या जिल्ह्यांबाबात निर्णय घेण्याचे अधिकार तेथील स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कोविड व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे.