(राजमुद्रा वृत्तसेवा) उजनी धरणातील पाच पीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला केल्याने पुणे येथील इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध दर्शवला आहे. इंदापूर तालुक्यातील हिंगणगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह आक्रमक भूमिका घेत पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केले आहे.
जयंत पाटील यांनी उजनी धरणातील पाच पीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पुण्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षच्या कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांसह टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत विरोध दर्शवण्यात येत आहे.