मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात नवघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही कबूल केलं आहे की त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर आदेश नव्हता. ते विदाऊट एनी सिक्युरिटी कन्सेंट परमिशन तुमच्या परिसरात घुसले. म्हणून दोघांनीही बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल यासंबंधात एफआयआर रजिस्टर करून पोलिसांनी दोन्ही संबंधित अधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या अर्धा डझन गुंडांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केलीय.
19 सप्टेंबरला याच मुलुंड, नवघर पोलिसानी बेकायदेशीरपणे मला सहा तास कोंडून ठेवलं त्याचीही तक्रार या पोलीस स्टेशन केली होती. 19 सप्टेंबरला आज एक महिना झाला तरी काहीही केलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी तक्रार रिजेक्ट करावी किंवा एफआयआर दाखल करावा. मुंबई पोलिसांनी त्याची चौकशीही केली नाही, याचा अर्थ हे पोलिसांचे माफियागिरी करत आहेत. हा प्रकार आपण खपवून घेणार नसल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय.
पोलीस अथॉरिटी आणि दुसरं हायकोर्ट अशा दोन्हीकडे जाण्याचे आमचे मार्ग आता मोकळे झाले आहेत. एका महिन्याच्या आत त्याची दखल घेऊन कारवाई करायची असते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सात दिवसाच्या आत जर पोलिसांनी कारवाई केली नाही, दखल घेतली नाही तर पोलिसांविरोधात कारवाई करण्यासाठी माझा मार्ग मोकळा असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.
ठाकरे सरकारची गुंडगिरी सुरु आहे. पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग केला जातोय. त्यांच्या लक्षात आलं की ठाकरे आणि पवारांच्या माफियागिरीला किरीट सोमय्या घाबरत नाही. माफियागिरी करणाऱ्या पोलिसांना आणि महापालिका इंजिनियरला ही सोडणार नाही. कुणाच्या घरात, परिसरात दसऱ्याच्या दिवशी येत नाहीत. त्याचा धडा मी पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना शिकवणार, असा इशाराही सोमय्यांनी दिलाय.