जामनेर राजमुद्रा दर्पण । दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही पोलीस बांधवासाठी संपूर्ण महाराष्ट्रत काम करणाऱ्या युथ एज्युकेशन वेलफेयर सोसायटी संचलित युथ पोलीस कडून हा उपक्रम राबवला जातो. कोरोना काळात आरोग्य विभागासहित पोलीस विभागाने सुद्धा रात्रंदिवस दिवस आपले कर्तव्य निभावाले. काही सुखरूप घरी आले तर काहींनी आपला जीव गमवला.पोलीस बांधव आपल्या संरक्षणासाठी त्याचे आयुष्य पणाला लावतात. देशांतर्गत कायद्धा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस बांधव पार पाडत असतांना त्यांना आपल्या कुटूंबासमवेत सण उत्सव ही साजरी करता येत नाहीत. त्यांच्यासाठी एक समाजाचा घटक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे. या भावनेतून युथ पोलीसचे संस्थेचे अध्यक्ष नितीन सुराणा यांनी पोलीस बांधवां सोबत कोजागिरी पौर्णिमे निमित्त उपस्थित मान्यवरांसह पिण्यासाठी विशेषत गाईचे दूध वाटप करण्यात येऊन गाईच्या दुधापासून होणारे फायदे सांगून गोसंवर्धनाचा संदेश ही देण्यात आला.
यावेळी, अध्यक्षस्थानी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक किरण शिंदे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष नितीन सुराणा, युवराज तंवर, ईश्वर पाटील, राहुल चवरे, महेंद्र चवरे, दीपक कंडारे, शरद राजपूत, दीपक तायडे,व जामनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व होमगार्ड आदी उपस्थित होते.