(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा) पुणे जिल्ह्यामध्ये म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पुणे सध्या राज्यातील सर्वाधिक म्यूकरमायकोसिसचे रुग्ण असलेला जिल्हा म्हणून गणला जात आहे. पुणे हे म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे हॉटस्पॉट झाले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे.
पुण्यामध्ये आतापर्यंत ९ लाख ६२ हजारावर कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ४८ हजार हे सध्याचे एक्टिव रुग्ण आहेत. पुण्यामध्ये म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत 318 रुग्ण आढळले असून हा आकडा इतर जिल्ह्यांच्या मनाने खूप आधीक असल्याचे दिसून आले आहे. म्यूकरमायकोसिस मुळे अद्याप २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
म्यूकरमायकोसिस संदर्भात कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिला आहे. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यापेक्षा म्यूकरमायकोसिस सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे पुणे हे म्यूकरमायकोसिसचे हॉटस्पॉट म्हणून गणले जात आहे.
कोरोना उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या स्टेरॉइड उपचार पद्धतीमुळे शरीरात निर्माण झालेल्या कमजोरीवर हा बुरशीजन्य आजार आपला प्रभाव दाखवतो. कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉईडमुळे शरीरात मोठ्या प्रमाणावर शुगर वाढते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांना याचा अधिक धोका संभवतो. यावर उपाय म्हणून सध्या स्टेरॉइडच्या अनावश्यक वापरावर शासनाकडून मर्यादा ठेवण्यात येत असून खरंच आवश्यकता असल्यासच वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.