जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात कल्याण मटका जुगारावर काल रात्री धाड टाकून पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. योगेश दौलत महाजन (36) हरीविठ्ठलनगर जळगाव, संतोष विटट्ल भोई (38) रा. हरीविट्टनगर जळगाव, मुकेश चरणदास राठोड (30) रा.हरीविठ्ठलनगर जळगाव, अशोक रामदास सोनार (63) रा हरीविठ्ठनगर जळगाव, शंकर वेडु भोई रा.हरीविठ्ठलनगर जळगाव, शिवा राजधर मिस्तरी (45)रा. हरीविठ्ठनगर जळगाव, गणेश गुरुमुख पवार (35) रा. हरीविठ्ठनगर जळगाव, रमेश पुंडलिक जगताप (53) रा. हरीविठ्ठनगर जळगाव, धनराज सिताराम पाटील (67) रा.खंडेराव नगर शिंपीगल्ली जळगाव, रविंद्र अमृत बोरसे (42)रा हरीविठ्ठनगर जळगाव अशी अटक केलेल्या दहा जणांची नावे आहेत. कैलास बुधा हटकर रा. हरीविठ्ठलगर यांच्या सांगण्यावरुन हा जुगार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. तरी कैलास हटकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
यावेळी, अटक केलेल्या सर्वांकडून सट्टा जुगाराचे साहित्य आणि 4730 रुपये हस्तगत करण्यात आले आहे. पो.कॉ.अजय सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामदास वाकोडे यांच्यासह स.पो.नि.शिंदे, स.पो.नि. संदीप परदेशी, उप निरीक्षक देशमुख, प्रवीण जगदाळे, पो.कॉ. अजय सपकाळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.