जळगाव राजमुद्रा दर्पण । दिवाळी तोंडावर असतांना सोने आणि चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात आज पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात २२० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात ११८० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमत किंचित १० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदी प्रति किलो १२१० रुपयाने महागली होती.
जळगाव सराफ बाजारात आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६१० रुपयाने इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६७,१४० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते
मागील गेल्या काही दिवसात चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. या महिण्याच्या १ ऑक्टोबर ला चांदीचा भाव प्रति किलो ६१ हजार रुपये इतका होता. त्यात सततची वाढ होऊन गेल्या २० दिवसात चांदीच्या भावात तब्ब्ल ६००० हजारांहून अधिकची वाढ झाली.
या महिन्याच्या १ ऑक्टोबरला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७४१० रुपये इतका होता. त्यात २० दिवसात १२०० रुपयाची वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून या काळात लोक दागिने खरेदी करणे पसंद करतात. परंतु ऐन सणासुदीत सोने आणि चांदीने भाव वाढले आहे. पुढील महिण्यात दिवाळी आहे. या दरम्यान तरी सोने चांदी दर कमी होतील का? याकडे खरेदीदारांच्या नजरा लागून आहे.
दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते १३ ते १४ हजार प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.
सोमवारी (१८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० होते, त्यात ७२० रुपयाची घसरण झाली होती. मंगळावारी (१९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,४०० इतका होता. त्यात किरकोळ ८० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२० ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३९० रुपये इतका आहे. त्यामध्ये १० रुपयाची किंचित घट झाली होती. तर आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६१० रुपयाने इतका आहे.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.