जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे आज २१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त पोलीस दलातर्फे वर्षभरात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना मानवंदना देण्यात आली. गत वर्षभरात संपूर्ण देशातील ३७७ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले.
या दिवशी मागील एक वर्षातील म्हणजे १ सप्टेंबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२१ या वर्षा मध्ये जेवढे पोलीस कर्मचारी, निमलष्करी दल शाहिद होतात त्यांना अभिवादन देण्यासाठी हा दिवस पाडला जातो. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीन सैनिकांसोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हा पासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान शहीद झाले होते अशा जवानांना या दिवशी श्रद्धांजली दिली जाते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह कर्मचारी व अधिकार्यांची आदींची उपस्थिती होती.