जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्हा बँकेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्जावर अधिकाऱ्यांसमोर जी सही करावी लागते त्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे तसेच नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी हायकोर्टात जाण्याचा ईशारा देखील दिला आहे.
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक धामधूम सुरू असताना भाजपचे उमेदवार असलेल्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांच्याकडून लाचेची मागणी होत असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा च्या वतीने भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कालच हरकतीच्या दिवसात माजी आमदार स्मिता वाघ तसेच रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. आणि त्यातच आज जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांना सही करण्यासाठी पन्नास हजाराची लाचेची मागणी करण्यात आली आहे. असा आरोप अत्तरदे दापत्य यांनी केला आहे.
दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज बाद होत असताना विकास आघाडीच्या एकूण तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. यामुळे भाजपाचे राजकीय अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसब लागणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारली जात असल्याचे सांगितले जात आहे.