जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीत फेरबदल होणार असे माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत होती, तसेच अनेक माध्यमांमध्ये देखील वृत्त देण्यात येत होते. मात्र अखेर उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादी महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची निवड करण्यात आली आहे.
कट्टर समर्थक असलेले अशोक लाडवंजारी यांची निवड महानगराध्यक्ष पदासाठी निश्चित मानले जात होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मावळते महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला राजीनामा या अगोदरच पक्षश्रेष्ठींकडे दाखल केला होता. त्याला बराच अवधी गेल्यानंतर लाडवंजारी यांची निवड करण्यात आली आहे. अभिषेक पाटील यांनी आपले राजीनामा पत्र दिल्यानंतर त्यात जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. यावरून राष्ट्रवादी मध्ये मोठे घामासान रंगले होते मात्र जिल्ह्यातील नेत्यांनी यावर मौन धारण केले होते. याबाबत जे काही होईल ते राज्य पातळीवरून होईल असे देखील सांगितले जात होते. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कट्टर समर्थक असलेले अशोक लाडवंजारी यांची निवड अखेर महानगराध्यक्ष पदाकरिता करण्यात आलेली आहे.