जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरातील गेल्या दोन वर्षभराची स्थिती पाहून मनपा प्रशासनाने यंदा कर्मचाऱ्यांना एन दिवाळीत अडचण येवू नये, म्हणून वेळेआधीच वेतन देवून महागाई भत्ता व महागाई फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनपा प्रशासनाने ७ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेने दिवाळीत पेन्शनधारकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे वसुलीदेखील चांगल्या प्रकारे होवू शकली नाही. मात्र, कोरोनाच्या गंभीर काळातदेखील महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिका प्रशासनाने ऑक्टोबर महिन्याचे वेतनासाठी ४ कोटी ३० लाखांची रक्कमेसह महागाई भत्याच १ कोटी व महागाई फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला तेच. दिवाळीच्या तोंडावर महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता दिला जाणार असल्याने मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.