जळगाव राजमुद्रा दर्पण । कंडारी व भोने फाटा शिवरस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे नागरिकांना रस्त्याने जातांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती. म्हणून कंडारी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिप सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ त्यांना स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून दिले आणि मुरूम टाकण्याची व्यवस्था केली.
यावेळी कंडारी येथील शिवसैनिक फारुख पटेल, सरपंच शकील पटेल, उपसरपंच दगा पटेल, युसुफ पटेल, वहिद पटेल, रेहमान पटेल, मुसा पटेल, रहीम पटेल, शाहरूख पेटल, फत्तु पटेल, तोसिफ शाह, छोटू पाटील आदी उपस्थित होते.