जळगाव राजमुद्रा दर्पण | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशा नंतर जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल होतील हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अशोक लाडवंजारी यांना अखेर जळगाव शहराचे अध्यक्षपद देण्यात आले. यामुळे काहीशी नाराजी पक्षामध्ये दिसत असली तरी मावळते महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी पुढाकार घेत आपल्या समर्थकांसह नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांचा फुल गुच्छ देऊन सन्मानित केले व शुभेच्छा दिल्या आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान पराभूत झाल्यावर देखील त्यांनी थेट विजयी उमेदवार राजुमामा भोळे यांचे कार्यालय गाठत शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता देखील महानगराध्यक्ष पद सोडताना देखील नवनिर्वाचित अध्यक्ष लाडवंजारी यांना शुभेच्छा दिल्या आहे. यामुळे भविष्यातील अभिषेक पाटील यांचे राजकारण कोणत्या वळणावर जाते याबाबत विविध चर्चा रंगल्या आहे.
विधानसभा निवडणुकीत अचानकपणे पक्षश्रेष्ठींनी सुचवल्या नुसार जामनेर याची त्यांना जळगावातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध उमेदवारी करण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. मात्र अचानक पणे जळगावचा उमेदवारी त्यांना देण्यात आली ऐन वेळेस उमेदवारी करून देखील जळगाव शहरातून पन्नास हजाराचा टप्पा गाठत त्यांनी विक्रमी मताधिक्य भाजपा उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्याविरुद्ध मिळवले. यावरून जळगाव शहराच्या निकालावर तसेच राजकारणावर अभिषेक पाटील यांनी छाप सोडली याची दखल घेत वरिष्ठांनी जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी यांची वर्णी लावली होती.
मात्र, खडसेंच्या प्रवेशानंतर संपूर्ण फेरबदलाचे वारे वाहू लागले वरिष्ठांच्या आदेशानंतर अशोक लाडवंजारी यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.
महानगर अध्यक्ष पदावरून प्रदेश कार्यकारणीवर पाटील यांना बढती देण्यात आली होती, यावरून अभिषेक पाटील नाराजी व्यक्त केली होती, आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी वरिष्ठ नेत्यांनावर चांगले काम करीत असून ते अंतर्गत विरोधकांना सहन होत नाही म्हणून राजीनामा देत असल्याचे म्हटले होते यावरून अभिषेक पाटील हे महाराध्यक्ष पदामुळे अधिक चर्चेत आले होते. त्यांनी थेट आपली नाराजी बाजूला सारत अशोक लाडवंजारी यांना फुल गुच्छ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.यावेळी अनेक उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.
जिल्हा राष्ट्रवादीमध्ये अनेक गट – गट असल्याचे हे सर्वश्रुत आहे, यामुळे पक्षाला मोठा फटका देखील बसला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी महानगराध्यक्ष पदावरून पेटलेले रान संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादीत गाजले. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी या विषयावर अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. या प्रकरणावरून दोन वेगवगेळे गट दिसून आले. अनेकांनी तत्कालीन महानगराध्यक्षां बद्दल तक्रारी केल्या तरी कोणी समर्थन केले होते. माजी मंत्री खडसे यांच्या प्रवेशानंतर फेरबदल निश्चित होते त्यांचे कट्टर समर्थक असलेले अशोक लाडवंजारी यांना पक्षातील महत्वपूर्ण पदावर सन्मान देण्यात येईल असे देखील सांगितले गेले होते. त्यानुसार महानगराध्यक्ष पदावर लाडवंजारी यांची वर्णी लावण्यात आली आहे.