जळगाव राजमुद्रा दर्पण | आमदार मंगेश चव्हाण तसेच पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना जिल्हा बँकेत पराभूत करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावे असून ते सादर केल्यास त्यांना निवडणुकीतून बाद केले जाऊ शकते. बी एच आर पतसंस्थेचे त्यांनी कर्ज घेतले मात्र ते दिलेले नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला अनेकांची बीएचआर मध्ये फसवणूक करणारे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची बँक कशी चालू शकतील असा देखील संवाद माजी मंत्री पाटील यांनी उपस्थित केला आहे .मात्र आम्हाला निवडणूक निवडणुकी प्रमाणेच लढायचे आहे भाजपा कामाने कुठल्याही थराला जाऊन मतदारांमध्ये दिशाभूल करण्याचे काम आम्ही करणार नसल्याचे माजी मंत्री सतीश आण्णा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे यावेळी त्यांनी गिरीश महाजन सह अन्य भाजप आमदारांवर निशाणा साधत टीका केली आहे. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आमदार मंगेश चव्हाण हे नामनिर्देश भरण्याच्या दिवशी मुद्दामून माझ्यासह महा विकास आघाडीच्या उमेदवारांवर तसेच त्यांच्या कागदपत्रांवर आक्षेप नोंदवत होते. कारण नसताना पतसंस्था वर कर्ज यावरून मी सतीश पाटील उमेदवारी अर्ज करू शकत नाही असे आमदार चव्हाण यांचे म्हणणे होते, मात्र संस्थेवर कर्ज आहे त्यात माझ्या उमेदवारीचा काय संबंध अशी देखील स्पष्ट भूमिका सतीश पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांना सतीश पाटील यांनी कुंभमेळ्यात भरपूर पैसा खेळवला यामुळे पैसे असल्याकारणाने आमदार चव्हाण यांना सहकारातील भरपूर अनुभव असल्यागत ते वागत असल्याचे माजी मंत्री सतीश पाटील टोमणा लगावला आहे.
भाजपचे नेते मंडळी तसेच माजी मंत्री गिरीश महाजन हे मतदारांची दिशाभूल करीत आहे. मात्र मतदार ज्यांना योग्य जागा दाखवेल असा देखील विश्वास माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी टीका केली. बँकेमध्ये अद्याप पर्यंत सर्वपक्षीय पॅनल असताना कुठल्याही सभासदाने चुकीचे कृत्य केलेले नाही. अथवा कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही उलट शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय आतापर्यंत घेण्यात आले. मात्र भाजपचे नेते मंडळी मतदारांची दिशाभूल करीत असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी भाजप नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीचे एकूण सहा उमेदवार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहे. मतदारांनी विश्वास दाखवत उमेदवारांना निवडून दिले याबद्दल त्यांचे आभार आम्ही नेहमीच शेतकऱ्यांसाठी कृतिशील राहु तसेच शेतकरी हिताचे निर्णय आगामी काळात घेतले जातील असे देखील त्यांनी सांगितले.