जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आमची चर्चा भाजपसोबत सुरू होती यामध्ये सर्वपक्षीय पॅनल चे नेतृत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील करीत होते. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकी सुरू असताना दुसरीकडे भाजपकडून वरिष्ठ नेत्यांना वेगवेगळ्या राजकीय चौकशा लावून त्रास दिला जात होता. कारण नसताना ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून नाहक बदनामी तसेच चौकशा लावला जात आहे. त्यातच दुसरीकडे सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून भाजपसोबत जळगाव जिल्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पॅनल उभारले जात होते. या सर्व विषयाची माहिती राज्यातील वरिष्ठ नेत्यांना दिली असता त्यांनी थेट भाजपसोबत जाण्यास नकार दिला. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार भाजपा सोबत कोणत्याही पद्धतीचे तडजोड करायची नाही असे ठरवण्यात आले. त्यानुसार जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये महा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जात आहे. या संदर्भातील जागावाटपाचे देखील येत्या दोन दिवसांमध्ये नियोजन होणार असल्याचे माजी मंत्री देवकर यांनी सांगितले.
सर्व पक्षीय पॅनल करीता आमच्या सोबत भाजपने चर्चा जरी सुरू केली असली तरी आम्ही सर्वच उमेदवारांना फॉर्म भरण्याचे आवाहन केले होते. माघारीच्या वेळी जे काही ठरेल त्यानुसार सर्वपक्षीय पॅनल ठरवण्यात येईल असे देखील सांगितले गेले होते. मात्र भाजप करत असलेला पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी फेटाळून लावले आहे. आणखी काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता असून याच याकरिता बोलणी सुरू असल्याची माहिती यावेळी देवकर यांनी दिली आहे लवकरच जागा निश्चित करून महाविकास आघाडीचा संयुक्तरीत्या चेअरमन निवड करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सर्वपक्षीय पॅनल संदर्भात भाजपकडून करण्यात येत आहे. गिरीश महाजन आणि पर्यंत चे भाजपमधील आमदार राजू मामा भोळे यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करीत टीका केली आहे. जर जिल्हा बँकेमध्ये युती करायची नव्हती तर मग तीन चार – चार बैठका कशासाठी केल्या थेट लढतीचे चित्र स्पष्ट करायचे होते. सर्वपक्षीय पॅनल उभारताना राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेसह नेत्यांनी भाजप च्या नेत्यां सोबत अजिंठा गेस्ट हाऊस येथे अनेक बैठका पार पाडल्या होत्या तेव्हा वरिष्ठांचा सल्ला घेतला असता असा टोमणा भाजप नेत्यांनी लगावला आहे.