जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत आहे. या मध्ये महत्वाचे म्हणजे माजी मंत्री मंत्री एकनाथ खडसे हे देखील उमेदवारी करीत आहे. जिल्हा बँक निवडणुकीत खडसे यांच्या विरुद्ध नाना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल होता मात्र भुसावळ येथील जय माता दी पथसंस्थेचे थकबाकीदार असल्याचे त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आणि यामुळे नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात नाना पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच भुसावळ येथील बाजार पेठ पोलीस ठाण्यात जय माता दी पथसंस्थेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. खडसे यांच्या समोर राजकीय आव्हान उभे करण्यासाठी नाना पाटील यांच्या भोवती भाजपची राजकीय लढाई सुरु असल्याचे दिसून येत आहे.
भुसावळ येथील जय माता दी पथसंस्थेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याने एक प्रकारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध राजकीय आव्हान आहे. भाजपच्या माध्यमातून खडसे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यात भाजप ला किती यश येते हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे. भाजप नेते आ. गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पॅनल लागली असून त्यांनी देखील भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महाजन यांच्या नेतृत्वात भाजपला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत किती यश मिळते हे निकाला नंतर स्पष्ट होईल.
नाना पाटील म्हणतात..
मुक्ताईनगर येथील सर्व सामान्य कुटुंबातील असलेले नाना पाटील हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अधिक चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र भुसावळ येथील जय माता दी पथसंस्थेचे कर्ज बुडवल्याचे कारण दाखवीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता यामध्ये नाना पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या प्रकरणी मुंक्ताईनगर येथील नाना पाटील यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. जय माता दि ह्या पतसंस्थेचा मी साधा सभासद देखील नाही मात्र खोटे दस्तावेज सादर करून माझी उमेदवारी अवैध ठरण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे. यामध्ये राजकीय विरोधकांनी कुरघोड्या करीत हे कटकारस्थान घडवून आणले असल्याचा आरोप खडसे यांचे जिल्हा बँकेतील राजकीय विरोधक असलेले नाना पाटील यांनी केला आहे. यामध्ये त्यांनी जय माता दी या संस्थेचे कर्ज घेतले असल्याचे आरोप फेटाळून लावला आहे आजगायत जय माता दी पतसंस्था कुठे आहे मला माहिती नाही, अथवा मी त्या पथसंस्थेचा सभासद देखील नाही खोटे दस्तावेज दाखवून दिशाभूल केली जात आहे. यामुळे माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याचा संबंध येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व प्रकरणी त्यांनी जय माता दि पथसंस्थे विरोधात बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जय माता दी या पथसंस्थेचे सचिव व व्यवस्थापका विरुद्ध फसवणुक झाल्याची तक्रार दिली आहे. यामुळे खडसे यांच्या भोवती नाना पाटील हे राजकीय आव्हान उभे करण्यात यशस्वी ठरतात काय ? या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देत याकडे लक्ष लागून आहे.