जळगाव राजमुद्रा दर्पण | धार ते कवठळ शिवरस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. धार येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांची भेट घेऊन या शिवरस्त्याची दुरावस्था सांगितली होती. मंत्रीमहोदयांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील धार येथे द्वारदर्शनासाठी आले होते.
त्यावेळी ग्रामस्थांसोबत चिखल तुडवत रस्त्याची पाहणी केली.
सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम येत्या 8 दिवसात सुरू करण्याचे आश्वासन जिप सदस्य प्रतापभैय्या यांनी धारवासीयांना दिले. याप्रसंगी नारायण बोरसे, दिपक पाटील, सुभाष पाटील, रविंद्र पाटील, माधव पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश पाटील, प्रताप पाटील, अंकुश पाटील, अमोल पाटील, ललित पाटील, सौरभ पाटील, दीपक साबळे व ग्रामस्थ