भुसावळ राजमुद्रा दर्पण – तालुक्यातील मिरगव्हाण शिवारात स्व. दगडाबाई चंपालालजी बियाणी शैक्षणिक विकास मंडळाने गट नं. ९६/१, ९६/२, ९६/३ या खुल्या जागेवर शासनाच्या खुल्या जागेवर संस्थेचे नाव लावून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत शासनाचे परिपत्रक असतांना तत्कालीन तहसीलदार व संस्थेने आपल्या नावावर सदर जागेचा वापर शासनाची परवाणगी न घेता शैक्षणिक संस्थेसाठी केला आहे. याबाबत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी योेथिल प्रांताधिकार्यांना दिले आहे.
सदर संस्थेने शासनाच्या नावाऐवजी संस्थेचे नाव लावून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार येथिल माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी याबाबत तात्काळ चौकशी करुन स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकार्यांना दिले आहे.