बांबू लागवडीला चालना देण्यासाठी पंचायतराज मंत्री ना.कपिल पाटील यांची नवी दिल्ली येथे घेतली भेट
माजी आमदार पाशा पटेल कोण बँक संचालक संजय करपे यांच्यासोबत मंत्री महोदयांसोबत झाली चर्चा
नवी दिल्ली – पंचायत राज योजना आणि अंमलबजावणी त्याचप्रमाणे बांबू लागवडीतून पàर्यावरणाचा समतोल राखीत ग्रामविकास आणि ग्रामपंचायत तसेच शेतकरी सक्षम करण्यासाठी बांबू लागवड ही मोठ्या प्रमाणात गावपातळीवर केली जावी. यासाठी पंचायतराज मंत्री ना.कपिल पाटील यांच्यासोबत नविदिल्ली येथे आज बैठक संपन्न झाली असुन बांबु लागवडीतून ग्रामविकास व पर्यावरण समतोल राखण्यासाठी ग्रामविकास आणि ग्रामपंचायत तसेच शेतकरी अधिक आत्मनिर्भर करण्यासाठी लवकरच माननीय पंतप्रधानांसोबत बैठक आयोजित केली जाणार आहे. अशी माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे
आज राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल तसेच बांबु मॅन तथा कोण बँक संचालक संजय कर्पे यांच्यासह देशाचे पंचायत राज मंत्री ना. कपिल पाटील यांची आज नविदिल्ली येथे भेट घेतली. यावेळी माननिय मंत्री ना. कपिल पाटील यांनी बांबू लागवड पासून होणारे फायदे तसेच बांबू पासुन निर्मित विवीध वस्तू आणि बांबु मॅन तथा कोण बँक संचालक संजय कर्पे यांनी विदेशात बांबू पासुन बनविलेले रिसोर्ट हॉटेल यांची माहिती घेतली. मंत्री ना.कपिल पाटील यांना बांबूनिर्मित प्रक्रिया केलेल्या विवीध वस्तूंची भुरळ पडली.त्यांनी कोकणात आणि आदिवासी भागात रोजगारातून पर्यावरण आणि अर्थकारण करण्याचा संकल्प त्यांनी केला. तसेच मनरेगाच्या सुलभीकरणातून आणि मनरेगा व वित्त आयोगाचा एकत्रीकरण करून बांबू लागवड करता येईल का याबाबत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांसोबत बैठकीचे आयोजन करू अशी हमी त्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली. प्रयत्न –
खा. उन्मेश पाटील यांची माहिती…