सिल्वासा राजमुद्रा दर्पण । शिवसेना खासदार संजय राऊत सध्या दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. दादरा नगर हवेलीच्या मुद्यासोबत एनसीबीवरुन संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. एनसीबी अनेक प्रकरणे केली. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
फडणवीस यांना वाटत असेल की ते इथे आल्याने मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. तपास यंत्रणांचा वापर हा केंद्राचा महाराष्ट्र सरकार विरोधातील कट आहे. स्वतः मुख्यमंत्रीही तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात सरकार आले नाही याचा राग काढला जात आहे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, कुणापुढे झुकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले. गेल्या काही काळात एनसीबीनं अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले ? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असं राऊत म्हणाले.
एका ज्येष्ठ खासदार आपलं जीवन संपवतो आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला वाटलं नाही की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ? महाराष्ट्र सरकार ती चौकशी करतेय पण केंद्र सरकारची पण जबाबदारी होती. भाजपचे अनेक लोक या प्रकरणाशी संबंधीत कारण डेलकर यांच्या चिट्ठीत अनेकांची नावे. इथल्या प्रशासकाचे नाव त्या चिठ्टीत होतं. अशा प्रकारच्या निवडणुका भाजपने लढवल्या नाहीत का ? आम्हाला खडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासकाच्या खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत ? इथली जनता त्रस्त आहे…म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. मिस्टर फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करीत आहेत,असं संजय राऊत म्हणाले. आम्हाला ख्रात्री पूर्ण खात्री ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील,असंही संजय राऊत म्हणाले.
समीर वानखेडे प्रकरणी बोलताना संजय राऊत यांनी ज्याने पाप केले तर त्याला भरपाई करावी लागेल. काही कधीच लपून राहतील. नवाब मलिक हे ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्या दुर्लक्षित करून चालणार नाही.एनसीबी आणि वानखेडे प्रकणात कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्राचे ताठ कण्याचे आहे, केंद्र सरकार पुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. समीर वानखेडे यांनी जे काही केलं त्याची चौकशी व्हायलाच हवी असं संजय राऊत म्हणाले