चंदीगड राजमुद्रा दर्पण । पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये राहणार नाही, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं. आपला नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलं आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांचा पक्ष पंजाबमधील सर्व 117 जागांवर लढेल. “वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व 117 जागा लढवू, मग ते जागा वाटपातून असो किंवा स्वबळावर,” अमरिंदर सिंग पुढे म्हणाले.
नवज्योत सिंग सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला. “मागच्या वेळी तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि तेव्हा तुम्ही तुमचे मतदार गमावले. तुम्हाला केवळ 856 मतं मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल पंजाबचे लोक पुन्हा तुम्हाला शिक्षा देण्याची वाट पाहत आहेत,” अशी टीका सिद्धू यांनी केली आहे.