जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री संत मुक्ताबाई संस्थांनचे अध्यक्ष ॲड. भैयासाहेब रविंद्र पाटील हे काल दुपारी जलचक्र तांडा ता.बोदवड जि.जळगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी उपस्थित राहिले होते. त्यांच्या तिथे उपस्थित राहिल्याबद्दल काल रात्री दहा वाज्याच्या सुमारास सागर प्रभाकर पाटील या फेसबूक बुक अकाउंट वरून त्यांच्याबद्दल बदनाम कारक पोस्ट करून ॲड. भैयासाहेब रवींद्र पाटील यांची बदनामी करण्यात आली. सदर व्यक्ती वारंवार अशा प्रकारच्या पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. तरी आपण सदर व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हासरचिटणीस अशोकभाऊ पाटील, एरंडोल शेती खरेदी विक्री संघ मा.सभापती सुदामभाऊ पाटील, मनपा मा . नगरसेवक सुनिलभैय्या माळी, राष्ट्रवादी काँग्रेस मा.सरचिटणीस सुशील शिदे, राष्ट्रवादी काँग्रेस मा.सरचिटणीस विशाल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस मा.उपंअघ्यक्षअकिरभाई पटेल, रितेश पाटील, योगेश लाडवंजारी आदी उपस्थित होते.