जळगाव राजमुद्रा दर्पण । यावल तालुक्यातील कासारखेडा येथील विकास पुना कुंभार (वय-४९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी दुपारी उघडकीस आलीय. त्यांच्या आत्महत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत वृत्त असे की, कासारखेडा येथील विकास कुंभार हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, त्यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना झोक्याच्या दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.