जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव नागरी सहकारी पतपेढीच्या सात संचालकांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. नागरी सहकारी पतपेढीतील तत्कालीन व विध्यमान संचालकाविरुध्द कलम ८८ अन्वये २ कोटी १७ लाखांवर जबाबदारी निश्चिम करण्यात आली होती. या सुनावणीमध्ये त्यांनी कोणताही खुलासा, पुरावा सादर न केल्याने सात विद्यमान संचालकांना जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पदावर राहण्यास अपात्र ठरवले आहे.
अपात्र केलेल्या विद्यमान संचालकांमध्ये दिलीप चिंतामण चौधरी, कुसुम प्रभागर पाटील, खुशाल तापीराम बोरोले, सिध्दार्थ बापू तायडे, सविता अनिल भोळे, मालती गजानन भंगाळे व सुधाकर विश्वनाथ ढाके यांचा समावेश आहे. या पतपेढीची कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात आलेली आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवाल सादर केला. त्यानुसार तत्कालीन व विद्यमान संचालकांवर २ कोटी १७ लाख १० हजार ७६७ एवढ्या रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
संचालकांनी संस्थेच्या कामकाजात अनियमितता, पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना पदावरून अनर्ह ठरवण्यात यावे, असा तक्रार अर्ज विकास उखर्डू नारखेडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केला होतो. त्या अनुषंगाने संबंधितांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली होती. पतसंस्थेचे तत्कालीन व विद्यमान संचालक कुसुम पाटील, मालती भंगाळे, दयाराम धोंडू पाटील, खुशाल बोरोले, सुधाकर होना पाटील, सिध्दार्थ तायडे, सविता भोळे, किरण विष्णू पाटील, दिलीप चौधरी यांच्यावर प्रत्येकी २१ लाख ३७ हजार २०४ रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आली. शालिग्राम लक्ष्मण बेंडाळे, प्रत्येकी चौकाशी फी ६ हजार रूपये, सुधाकर ढाके यांच्यावर २ लाख ७२ हजार ७२७ व चौकशी फी ६ हजार रुपये या प्रमाणे एकुण २ कोटी १७ लाख १० हजार ७६७ एवढ्या रकमेची जबाबदारी कलम ८८ अन्वये निश्चित केली होती. अधिनियम कलम ९८ प्रमाणे वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले होते. वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल केल्याचे नमूद केले आहे. ते पदावर राहण्यास अपात्र असल्याची खात्री झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी त्या सात संचालकांना अपात्रतेची कारवाई केली.