मुंबई राजमुद्रा दर्पण। समीर वानखेडेंच्या बहिणीने राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. तसेच नवाब मलिकांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. याच दरम्यान मलिकांनी समीर वानखेडेच्या पहिल्या लग्नाचे फोटो, निकाहनामा आणि समीर यांचे जन्म प्रमाणपत्र जाहिर केले आहे. तसेच समीर हे मुस्लिम असल्याचे म्हणत त्यांच्या कुटुंबावर आरोप केले आहेत. यासोबतच समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांच्यावरही वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर आता यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.
पोलिसात दाखल केली तक्रार
वानखेडेंच्या बहिण यास्मिन वानखेडे यांनी मलिकांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये देखील तक्रार दाखल केली आहे. यासोबतच या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. एका महिलेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी त्यांनी पत्र लिहून राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. एक नोकरदार माणसाच्या जन्म प्रमाणपत्राबाबत शोध घेणारे नवाब मलिक कोण आहेत? त्यांची रिसर्च टीम दुबईपासून मुंबईपर्यंत आमचे फोटो पोस्ट करत आहेत. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप यास्मिन यांनी केला आहे.