नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाल स्थगिती देत हा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेत काही त्रुटी असल्याची याचिका काही दिवसांपुर्वीच दोन विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. त्यामुळे NEET चा निकाल काही काळ थांबवण्यात आला होता.
मात्र आता न्यायालयाने यावर सुनावणी करत म्हटले आहे की, काही विद्यार्थ्यांसाठी आपण अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ठेवता येणार नाही’. असे म्हणत न्यायालयालाने परीक्षेचे निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच याचिकाकर्ता वैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचे सांगितलं आहे.