जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला सुरुवात झाली आहे दिलासादायक चित्र निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 494 तर कोरोना पासून बरे होणाऱ्या रुग्णांचा संख्या 512 असून तर एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनातील यंत्रणेने वेळोवेळी घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे जळगाव जिल्हात रुग्ण संख्या कमी करण्यात मोठे यश मानले जात आहे मात्र दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी जळगावकरांनी सज्ज राहण्याची गरज आहे.
देशात पहिल्या दहा जिल्ह्यात जळगाव जिल्हा कोरोना रुग्ण वाढीमुळे अग्रेसर होता अतिशय स्प्रेड होणारा जिल्हा कोणता असेल तर जळगाव मानला जात होता मात्र रुग्णांची कमी होत असल्याने जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेवरचा ताण देखील कमी झालेला दिसून येत आहे. तिसऱ्या लाटे ला रोखण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश देखील राज्यशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेत लहान बालकांना अधिक धोका असल्याचे तज्ञाचे मत आहे यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन संदर्भात लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे तसेच उचलेले कठोर पावले यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला सुरुवात झाली आहे.