मुंबई राजमुद्रा दर्पण । आर्यन खानला जामीन मंजूर, पण आजची रात्र तुरुंगातच काढावी लागेल. आर्यनशिवाय मुनमुन धमिचा आणि अरबाज मर्चंट यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, सध्या न्यायालयाकडून आदेशाची प्रत न मिळाल्याने या तिघांची शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत सुटका होणार आहे.
आर्यनला २ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले. त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आणि ७ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले. ८ रोजी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली असून आज त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने ४.४५ वाजता निकाल दिला. आरोपींच्या जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए एस जी अनिल सिंग यांनी एनसीबीच्या वतीने युक्तिवाद केला. आर्यनला जामीन मिळाल्यास पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते, असे ते म्हणाले. एएसजीने सांगितले की, आर्यन गेल्या काही वर्षांपासून नियमित ड्रग्ज घेत आहे. तो अनेक लोकांना ड्रग्ज पुरवत असल्याचे रेकॉर्ड दाखवतात. सापडलेल्या अमली पदार्थांच्या प्रमाणावरून तो अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्यन खानची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला होता की, अटक वॉरंटमध्ये वास्तविक आणि योग्य कारणांचा उल्लेख नसल्यामुळे अटक घटनात्मक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे. मर्चंटची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मंगळवारी याच प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना विशेष एनडीपीएस कोर्टाने दिलेल्या जामीनकडे लक्ष वेधले. त्यानंतर आज तपास यंत्रणा आणि सरकारी पक्ष या नात्याने एनसीबी आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमके काय होते. हे पाहणे अति महत्वाचे ठरणार आहे.