(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे आणून विक्री करणाऱ्या अमळनेर येथील मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशनला जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम जळगाव यांनी वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून ५ हजार रुपये किंमतीचे ५ कापूस बियाणे पाकिटे जप्त केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
अमळनेर येथील मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर चे मालक जितेंद्र दिनकर पाटील यांच्याविरुध्द बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वैभव शिदे, तालुका कृषि अधिकारी, अमळनेर भरत वारे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, जिल्हा परिषद, जळगाव, अमोल भदाणे, कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती, अमळनेर गणेश पाटील, व कृषि सहाय्यक अमळनेर यांच्या सहकार्याने पार पडल्याचे श्री. ठाकूर यांनी कळविले आहे.