जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे मागील काही दिवसांपासून गावठी कट्टयासह दहशत माजवीत होता. याबाबत मा.पो. अधीक्षक सो डॉ.श्री प्रविण मुंढे आणि मा.अपर पो. अधीक्षक सो श्री चंद्रकांत गवळी यांनी मा. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेळ मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आज दि.२८ रोजी जळगाव शहरात मोहाडी रोड भागातील परिसरात एक इसम हा त्याच्या कब्जात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन दहशत माजवत असल्याची गुप्त माहीती यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सफौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील, त्या ठिकाणी जाऊन आरोपी विक्की महेंद्र कोळी (वय – 20 रा.समता नगर जळगाव) याला ताब्यात घेतले.
यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता कमरेला खोचलेला 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि चॉपर मिळाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील योग्य त्या कारवाईसाठी त्या आरोपींतास फैजपुर पोस्टेच्या ताब्यात दिले आहे.