जळगाव राजमुद्रा दर्पण। जळगाव शहर कांग्रेस कमिटीचा नवनिर्वाचित पदग्रहण सोहळा जळगाव जिल्हा कॉग्रेस भवणात पार पाडण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये गटाचे राजकारण सुरू असताना प्रदीप पवार यांचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती काँग्रेससाठी पर्वणी मानली जात आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते जळगाव जिल्हा दौरा करून गेले मात्र त्यांना गटबाजीच्या अधिक दर्शन झाले. जळगावतील काँग्रेसला उभारणी देण्यासाठी नेमकं युक्ती कोणाची करायची याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी देखील संभ्रमात होते. मात्र गेल्या 30 ते 35 वर्षापासून काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर कार्यरत असलेले प्रदीप पवार हे अनुभवी असल्याने तसेच संघटन कौशल्य असल्याने त्यांची नियुक्ती असेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आली आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच जुनेजाणते काँग्रेसी यांच्या सोबत जोडून घेतले जाणार आहे त्यामुळे अनुभवी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आपल्या नियुक्ती दरम्यान दिले आहे.