जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून सर्वपक्षीय पॅनल चा किडा कायम असताना आता मात्र महाविकासआघाडी ने भाजप विरुद्ध रान पेटवण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ नेत्यांनी दिले दिलेल्या आदेशानुसार महा विकास आघाडी विरुद्ध भाजप असा लढा होणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. अजिंठा गेस्ट हाऊस येथे दुपारी चार वाजता महा विकास आघाडी मध्ये जागावाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिली आहे यामुळे महा विकास आघाडीच्या जागावाटपाचा होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडी मध्ये शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र येऊन जिल्हा बँकेची निवडणूक लढवीत आहे. यामध्ये अधिक जागा नेमकं कोणाला मिळतात याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे या बैठकीमध्ये तिन पक्षाचे कोर कमिटी मधील नेते सहभागी होणार आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
महाविकास आघाडीची प्रथमच भाजपा वगळून ही बैठक पार पडणार आहे यामध्ये विशेष म्हणजे भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन नसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याउलट महाजन यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना घेण्यासाठी महा विकास आघाडीची रणनीती जिल्हा बँकेत आखली जाणार आहे. महा विकास आघाडीला रोखण्यात महाजन किती यशस्वी ठरतात हे जिल्हा बँकेतील निकालानंतर स्पष्ट होईल.
नामनिर्देश पत्रावर घेतलेल्या हरकती वरून सर्व भाजप उमेदवार विभागीय आयुक्तांकडे आपले म्हणणे सादर करण्यासाठी गेले असता त्यांचे अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे यामुळे भाजपच्या सर्वच उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी जिल्हा बँकेत महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा असे रान दिसणार आहे.