जळगाव राजमुद्रा दर्पण । शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असे कांगावा भाजपाकडून केला जात आहे. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण झालेल्या आहेत. परंतू १ नोव्हेबर रोजी होणारा मोर्चा हा भाजप प्रॅक्टीस म्हणून काढवा, मोर्चा काढल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकास कामांबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. आमदार शिरीष चौधरी, आमदार किशोर पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.
भाजपाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चावर आक्षेप न नोंदविता तो मोर्चा भाजपने काढावा असे आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भाजपच्या ज्या मागण्या आहेत त्या या पूर्वीच मान्य झाल्या असल्याने मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपाकडून एक तारखेला शेतकऱ्यांच्या समर्थनात शिंगाडा मोर्चा राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची झालेली उपेक्षा यावर आक्रमक होऊन भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात येणार आहे . तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कडून सोडण्यात येत आहे. आसमानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आले असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गिरीश महाजन यांनी तिला आहे. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी भाजप कडून जिल्हाभरातून शेतकरी तसेच भाजपा पदाधिकारी एकत्र चीन हा मोर्चा काढणार असल्याची माहिती भाजपवर देण्यात आली आहे.