जळगाव राजमुद्रा दर्पण । पाचोरा-भडगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकरी अडचणीत सापडलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरिता पाठपुरावा केला. त्याची फलश्रुती म्हणुन राज्य शासानने रब्बी व खरीप या दोन्ही हंगामाची मदत जाहीर करून प्रत्यक्ष वाटपाला ही सुरवात केली आहे. ऐन दिवाळीत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना १०० कोटी रूपये मदत मिळणार आहे. आ. किशोर पाटील यांच्या प्रयन्नांना यश आले आहे.
याप्रसंगी ऍड. दिनकर देवरे, दीपक राजपूत, डॉ. भरत पाटील , ऍड. अभय पाटील आदी उपस्थित होते. आ. किशोर पाटील म्हणाले की, रब्बी हंगामात मार्च महीन्यात भडगाव, पाचोरा तालुक्यात मोठ्याप्रमात नुकसान झाले होते. त्यावेळी मी स्वत: शेतकऱ्यांची व्यथा पाहीली. ते दुख: विसरून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला. मात्र पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महीन्यात अतिवृष्टीत पाचोरा-भडगाव तालुक्यातील खरीप हंगाम पुर्णत: पाण्यात बुडाला. कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ही परीस्थीती पाहणे माझ्यासाठी अवघड होते. म्हणून मी शेतकऱ्यांशी फेसबुकव्दारे संवाद साधत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषाच्या तीन पट भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी १९ कोटी ५० लाख अनुदान भडगाव-पाचोरा या तालुक्यांना मिळाले त्यातील १८ कोटी एकट्या भडगाव तालुक्याला तर पाचोरा तालुक्याला १ कोटी ३१ लाख रुपये एवढे अनुदान प्रत्यक्ष प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटपाचे काम महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितपणे आनंदात जाईल याची मला खात्री आहे आणि आनंदही असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.