जळगाव राजमुद्रा दर्पण | मी आजही जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल यावे यासाठी प्रयत्नशील असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे भाजपला यातून वगळण्यात आलेले आहे. पहिल्या पासून सर्वपक्षीय पॅनल साठी माझा प्रयत्न होता यासाठी बैठकाही झाल्या मात्र त्यात आम्हाला अपयश आले अशी प्रतिक्रिया आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे.
सर्वपक्षीय पॅनल साठी पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसने भाजपासोबत जिल्हा बँकेत युती करण्यास नकार दिल्यामुळे गुलाबराव पाटील यांना या सर्व अनिकेत अपयश आले आहे. असे त्यांनी यावेळी मान्य देखील केले आहे. मात्र आजही सर्वपक्षीय पॅनल संदर्भात बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी मी तेव्हा पण आपण प्रयत्नशील होतो आणि आजही प्रयत्नशील आहे. असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
सर्वपक्षीय पॅनल मधून भाजपला वगळण्यात यावे ही पहिली मागणी काँग्रेसने लावून धरली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील सर्वपक्षीय पॅनेलमधून भाजपला स्थान नको म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावरून सर्व पक्षीयांचा पुढाकार घेणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अखेर महा विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँकेची निवडणूक लढावी लागत आहे. जर सर्वपक्षीय पॅनल जिल्हा बँकेत आले असते तर याच सर्व काही श्रेय पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना गेले असते मात्र महा विकास आघाडीतील काही नेत्यांना हे मान्य नव्हते असे देखील सांगितले जात आहे.