धुळे राजमुद्रा दर्पण । एलईडीप्रश्नी महापालिकेत शरम करो आंदोलनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.
एलईडीप्रश्नी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन झाले होते. त्यात लोकसेवकाच्या आदेशाची अवहेलना करून नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे भोसले, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कैलास चौधरी, महेंद्र शिरसाठ, कुणाल पवार, उमेश महाजन, संजय बगदे, राजू चौधरी, सलीम शेख लंबू, प्रमोद साळुंखे, वामन मोहिते, विजय वाघ, अस्लम खाटीक, कुंदन पवार, रईस काझी, मंगेश जगताप आदींसह २० ते २५ जणांनविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
भोसले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे महानगर शाखेने मनपाकडून एलईडी खरेदीमध्ये झालेला गैरप्रकाराबाबत आक्रमक आंदोलन केले. आंदोलन जनतेनासाठी होते. त्यामुळे असे शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. पण जोमाने पक्षाचे काम सुरूच राहील. अशा गुन्ह्यांना व भाजपच्या दडपशाहीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घाबरणार नाहीत.