मुंबई राजमुद्रा दर्पण । तीन लोकसभा आणि ३० विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकींसाठी मतदान सुरू आहे. तीन लोकसभांच्या जागा दादरा नगर हावेली, मध्य प्रदेश (खंडवा) आणि हिमाचल प्रदेश (मंडी) या राज्यांमध्या आहे आणि विधानसभेच्या जागा १४ वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. हे राज्य आहेत- बंगाल (४ जागा), आसाम (५ जागा), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, बिहार आणि मिझोराम.
या पोटनिवडणुका राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण यातून २०२२ च्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकींचा मतदारांचा कौल कळेल. खासकरून भाजप आणि काँग्रेससाठी काही जागा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.
फेब्रुवारीमध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे केंद्रशासित प्रदेशातील दादरा नगर हावेलील एकमेव जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे घटक आहेत. या जागेसाठी तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.