जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरात लसीच्या तुटवड्या मुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते उर्वरित दुसऱ्या डोस घेण्यासाठीचे दिवस पूर्ण झाल्यावर देखील लस मिळत नसल्याने नागरिकांन मध्ये संतापाचे वातावरण होते मात्र जिल्हा प्रशासनाने वेळेत दखल घेत लस उपलब्ध करून दिल्या आहे लसिकरणाचा दुसऱ्या डोस करिता 45 दिवस पूर्ण झालेले आवश्यक असून त्यांनीच केंद्रावर जावे यामुळे नागरिकांना होणार मनस्ताप कमी होणार आहे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या ठिकाणी मिळणार लस
शहरातील जळगाव महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात शाहूनगर,डी बी जैन हॉस्पिटल .शिवाजी नगर,
मुलतानी हॉस्पिटल मास्टर कॉलनी ,शाहीर अमर शेख हॉस्पिटल कुंभार वाडा शनीपेठ ,चेतनदास हॉस्पिटल सिंधी कॉलनी,स्वाध्याय भवन गणपती नगर,कांताई नेत्रालय निमखेडी रोड या ठिकाणी लस उपलब्ध होणार आहे.