नाशिक राजमुद्रा दर्पण । मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानची अखेर जामीनावर सुटका झाली. तो कारागृहातून बाहेर आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या जेलवारीचा भीषण अनुभव सांगितला. माझादेखील आर्थर रोड कारागृहाचा दोन-अडीच वर्षांचा अनुभव होता. अभिनेता संजय दत्तनेही कारागृहात टोप्या बनवल्याचं मला आठवतं असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं.
नाशिकच्या कारागृहात अनेक स्वातंत्र्य योद्धे राहिले आहेत. साने गुरुजीही याठिकाणी होते. कारागृहात येणारे कैद्यांमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काही समाजाला नकोसे असतात. तर काही लोकांना जामीन झाला तरी ते परत आत येतात. आतमध्ये सगळ्या सोयी असल्यानं काहीचं आत येणं जाणं सुरु असतं, असं मिश्किल वक्तव्य भुजबळांनी केलंय. त्याचबरोबर माझाही आर्थर रोड कारागृहाचा दोन अडीच वर्षाचा अनुभव आहे. गृहमंत्री असताना कारागृहातील पोलिसांचा पगार मी वाढवला. एक दिवस त्याच जेलमध्ये मला जावं लागलं. जे माझ्या स्वागतासाठी होते, नंतर तेच माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते, अशी खंत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. आता दिवस परत बदलले आहेत. काही खऱ्या आरोपाखाली जेलमध्ये असतात तर काही खोट्या आरोपांखाली असतात, असंही ते म्हणाले.
संजय दत्त यांनीही कारागृहात टोप्या बनवल्याचं मला आठवतं. कैदी कसे जनावरांसारखे राहतात हे मी पाहिलं आहे. प्रचंड गर्दी असते. पण तरी देखील कोरोना आत घुसला नाही हे महत्वाचं आहे. अनेक लोक 15 हजारांचा जामीन भरू शकत नाहीत म्हणून वर्षानुवर्षे आत आहेत. अशा लोकांसाठी काम करणाऱ्या आता अनेक संस्था आहेत, आपणही त्याच असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले.