मुंबई राजमुद्रा दर्पण। राज ठाकरे यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती समोर आली. राज ठाकरेंची २९ ऑक्टोबरला चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट आल्यावर ते कोरोनामुक्त झाल्याचे समजत आहे. तसेच आनंदाची बातमी म्हणजे राज ठाकरे यांच्या बरोबर त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहिण देखील कोरोना मुक्त झाले आहेत.
राज ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील परकार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. २३ ऑक्टोबर ला राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या मागोमाग आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली होती. सर्वांवर लिलावती हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात आले आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-१९ संसर्गाची लागण झाली होती. सौम्य ताप आणि लक्षणे दिसून आल्याने कोविड-१९ संसर्गाची चाचणी करण्यात आली होती.
त्यामध्ये राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि मोठी बहिण जयवंती ठाकरे- देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले होते. मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे- देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती.तरी देखील शुक्रवारी दुपारी परत एकदा तिघांची कोरोना प्रतिबंधक चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट सायंकाळी आला. या रिपोर्टमध्ये राज ठाकरेंनी कोरोनावर मात केली आहे.