जळगाव राजमुद्रा दर्पण । ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती, औरंगाबाद विभागाच्या वतीने ईपीएस पेन्शनर्स चे राज्य अधिवेशन दि ३१ ऑक्टोबर २०२१ रविवारी रोजी, अग्रसेन भवन, टाऊन सेंटर सिडको बस स्टॅण्ड जवळ औरंगाबाद येथे सकाळी ११.०० वा संपन्न होत आहे. मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवतजी कराड, औरंगाबाद पुर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल सावे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अधिवेशनासाठी मेळावा अध्यक्ष म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर श्री अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव इंजिनिअर श्री विरेंद्रसिंग जी राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ श्री पी एन पाटील साहेब, राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई आरस, राष्ट्रीय महिला आघाडीच्या पश्चिम क्षेत्र मुख्य समन्वयक सौ.सरिताताई नारखेडे, इंजिनिअर सी एम देशपांडे, (अध्यक्ष पश्चिम क्षेत्र ) रणजीतसिंग दसुंदी ( मुख्य समन्वयक, उत्तर भारत ) तपन दत्ता (मुख्य समन्वयक, पुर्व भारत ) रमाकांत नरगुंद ( मुख्य समन्वयक, दक्षिण भारत ) सुभाषराव पोखरकर ( पश्चिम क्षेत्र संघटन सचिव ) महाराष्ट्र अध्यक्ष एस एन अंबेकर ( महाराष्ट्र अध्यक्ष ) डी एन लिपने-पाटील ( उपाध्यक्ष महाराष्ट्र ) श्री कमलाकर पांगरकर( महाराष्ट्र कार्याध्यक्ष ) सुधीर चांडगे ( महाराष्ट्र सचिव ) डी एम पाटील (महाराष्ट्र संघटन सचिव ) श्रीमती माधुरी जोशी (राष्ट्रीय उपाध्यक्ष म.आ.)श्रीमती आशाताई शिंदे (राष्ट्रीय उपाध्यक्ष,म.आ.) श्रीमती जयश्री ताई किवळेकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष म.आ ) मोहनसिंग राजपूत (मुंबई प्रदेश समन्वयक) दादाराव देशमुख (मराठवाडा कार्याध्यक्ष ) भास्करराव मतसागर (मराठवाडा उपाध्यक्ष) तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.
गेल्या ६ वर्षांपासून पेन्शनर्स आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करीत असून गेली ३ वर्षं बुलढाणा येथे साखळी उपोषण सुरू आहे, देशभरात विविध राज्यात अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन संपन्न होत आहे.
केंद्र सरकारने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात ३ टक्के वाढ करून इपीएफ—९५ या खासगी क्षैत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जखमेवर पुन्हा एकदा मिठ चोळले आहे. केंद्र व राज्य सरकार सेवेत असलेल्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात नियमित वाढ करून त्यांना वाढत्या महागाई विरोधात दिलासा देत असते. मात्र हेच केंदसरकार देशभरातील खाजगी व निमसरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती रकमेत वाढ करण्याबाबत असंवेदनशिल भुमिका घेत अक्षम्य दुर्लक्ष करत असून सरकारने या कर्मचाऱ्यांना देखिल महागाई भत्यात वाढ करावी यासाठी संघटना आपली भुमिका नेहेमी मांडत आहे. ईपीएस ९५ पेन्शन संघटनेमध्ये सर्व खाजगी कंपन्या सर्व सहकारी बँका सहकारी साखर कारखाने व विविध महामंडळ व इतर संस्थामध्ये काम करणारे सर्व ८७ उद्योगधंदे यातील कामगार व कर्मचारी येतात पण सरकारच्या काही धोरणामूळे आपल्या कामगारांना कमी पेंन्शन मिळत आहे. दरम्यानच्या काळात पेन्शनच्या प्रश्नी देशाचे मा प्रधान मंत्री नामदार श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दोन भेटी देखील मथुरेच्या सांसद आदरणीय श्रीमती हेमामालिनी जी यांच्या विशेष पुढाकाराने झालेल्या आहेत, मा पंतप्रधान यांनी सदर प्रश्न सोडवणेबाबत आश्वासन देखील दिलेले आहे, परंतु या प्रश्नांची तड लवकर लागावी म्हणून पेन्शनर्स बचावो अभियान अंतर्गत व संघटना वाढीसाठी व मजबुतीकरणाच्या दृष्टीने सदरचे अधिवेशन महत्वपूर्ण ठरणार आहे. यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यातील पेन्शनर्सना उपस्थितीचे व अधिवेशन यशस्वी करणेसाठी जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री अरविंद ना.भारंबे व उपाध्यक्ष रमेश बाबुराव नेमाडे, सचिव दिनकर पाटील यांनी आवाहन केले आहे.