बुलढाणा राजमुद्रा दर्पण। चिखली तालुक्यातील केळवद गावात किन्होळा रोडवर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. शाखेचे खिडकीचे गज वाकवून दरोडेखोर बँकेत शिरले व बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड नेले आहे. जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्हा खिडकीचे गज वाकवलेले गेल्याचे पाहून त्याला चोरीचा संशय आला आणि त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली आहे. जवळपास २० लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. दरोड्याची माहिती मिळताच बुलडाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा मागोवा काढण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे हेही घटनास्थळी आले आहेत. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने बँकेच्या बाजूच्या शेतापर्यंत माग काढला. तिथे दरोडेखोरांचे हँडग्लोज व बॅटरी मिळून आली. सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद झाल्याची शक्यता असून, सीसीटीव्हीचे फूटेज तपासले जात आहेत.तिजोरीतून जवळपास २० लाख रुपये चोरून नेल्याची माहिती आहे.