नंदुरबार राजमुद्रा दर्पण । केंद्र सरकारतर्फे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकटात असताना सततच्या होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीस आला आहे. या सततची दरवाढ व महागाई विरोधात युवासेनेचे पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नंदुरबार व नवापूरमध्ये बैलगाडी व सायकल रॅली काढून निषेध केला.
केंद्र सरकारने पेट्रोल– डिझेल दरवाढीमुळे झालेली महागाई सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दरवाढ मागे घ्यावी अन्यथा युवा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनामध्ये युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.