जळगाव राजमुद्रा दर्पण। सध्या केळीला एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत भाव असून देखील व्यापारी बोर्डवरील जाहीर केलेल्या प्रत्यक्ष भावाप्रमाणे न घेता त्या पेक्षाही ५०० ते ६०० रुपये कमी दराने खरेदी करीत आहेत. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाचे उत्पन्न घेतले जाते. हा परिसर केळी उत्पादननासाठी प्रसिध्द आहे. परंतु सध्या स्थितीत येथील केळी उत्पादक शेतकऱ्याना व्यापाऱ्यांकडून तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. कारण बाजारात केळीला बोर्ड भाव असून सुद्धा केळीचा भाव व्यापारी स्वतःच्या मर्जी नुसार ठरवत आहेत.
केळी माल चांगल्या प्रतीचा उत्तम दर्जेदार असून सुद्धा व्यापाऱ्यांकडून माल काढण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र सद्या दिसून येत आहे. तर काही व्यापारी चांगल्या दर्जाची केळीमध्ये दोष काढून कमी किंमतीत मागणी करीत आहे. मात्र या गोष्टीवर बाजार सामितीकडून केळी व्यापाऱ्यांवर काहीएक अंकुश दिसत नसून व्यापारी व बाजार समिती यांच्यात काही साटेलोट आहे; कि काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे.
यामुळे शेतकरीला केळीवर लावलेला खर्च देखील निघणे मुश्कील होऊन गेले आहे. केळी हे पीक घरात साठवता न येणारे नाशवंत असल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्याला व्यापाऱ्याने मागणी केलेल्या भावात देण्यास भाग पडत आहे. या गोष्टीकडे बाजार समिती व कृषी विभागाने पूर्णपणे डोळेझाक केले असून यामुळे शेतकरी एन दिवाळीत आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. शेतकरी व्यापाऱ्याला भाव सबंधित माहिती विचारली असता वरती केळीला उठाव नसल्याने भाव नसल्याचे कारणे देतात.