मुंबई राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि आईच्याही नावे बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मोहन पाटील, विजया पाटील, नीता पाटील आणि सुनेत्रा पवार एका कंपनीत पार्टनर आहेत. अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांचे पैसे आले आहेत. ते परत दिले गेलेच नाही. अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आले. त्यांनी जावई, नीता पाटील, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि एए पवार यांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले. ए ए पवार हे अजित पवार यांच्या आईचं नाव आहे. अजित पवार यांनी घोटाळ्याचे पैसे पूर्ण ट्रान्सफर केले आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला.
गेल्या महिन्याभरापासून आयकर खात्याच्या धाडी सुरू आहेत. हजारापेक्षा जास्त कोटीची बेनामी संपत्ती बाहेर आली आहे. शेकडो कोटीचे नॉन ट्रान्स्फरंट एन्ट्रीज आहेत. त्याला हवालाही म्हणता येईल आणि शेल कंपन्यांचे व्यवहारही म्हणता येईल. बंद झालेल्या कंपन्यातूनही पैसे आलेले आहेत. आपण पाच पंधरा लेअर सुरू केल्या म्हणून आमची चोरी पकडली जाणार नाही, असं शरद पवारांना वाटतं का? असा सवालही त्यांनी केला आहे.