जळगाव राजमुद्रा दर्पण । दिवाळी एक-दोन दिवसांवर असतांना आज धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या भावात वाढ दिसून येत आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. ऐन दिवाळीत सोने आणि चांदीचे भाव वाढले आहे. या दिवसात लोक सोनं-चांदीचे दागिने खरेदी करतात. याच कारणामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, असं सांगितलं जात आहे.
जळगाव येथे सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव पुन्हा ४९ हजारांवर गेला आहे. मंगळवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २८० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा प्रति किलो २६० रुपयाने वाढली आहे. त्यापूर्वी काल १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३४० रुपयांची तर चांदी प्रति किलो ४०० रुपयाची घसरण झाली होती. चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,३१० रुपये इतका आहे. सप्टेंबर महिन्यात ४७ हजाराच्या खाली असलेला सोन्याचा भाव ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ होऊन तो पुन्हा ४७ हजारावर गेला. त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ दिसून आली. गेल्या ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या भावात १६८० रुपयाची वाढ झाली आहे.
शहरातील सराफ बाजारात गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये सोन्याचे दर ५१ हजार २०० रुपये इतका होता. यावर्षी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४९,०३० इतका आहे. म्हणजेच १२ महिन्यांच्या कालावधीतील घसरणीचा ट्रेंड लक्षात घेतला, तर सोने सुमारे २१७० रुपयांनी कमी झाले आहे.