मुंबई राजमुद्रा दर्पण। अनिल देखमुख यांना अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी याच क्रमाने बाकीचे देखील जे सुपात आहेत ते जात्यात जातील असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2014 ला नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते म्हणाले होते की, कुणाचाही कार्यकर्ता असु दे मग तो भाजपचा असो किंवा काँग्रेसचा. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही. देशातून राज्या-राज्यांतून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचा आहे. देशमुखांच्या बाबतीत शेवटी तेच झाले आहे. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिलेला होता. आता ईडीने अटकेची कारवाई केली आहे. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही’
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘अनिल देशमुखांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन हादरले आहे. या स्तरावरच्या कार्यकर्त्याने नेत्याने देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाजाशी द्रोह करायचा. तर समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न पडला आहे. तरीही अजुनही चौकशी सुरु असल्यामुळे मी थेट अनिल देशमुख दोषी ठरले असे म्हणून न्यायाधिशाची भूमिका घेणार नाही. पण अनिल देशमुखांच्या अटकेमुळे हा मॅसेज गेला की, किसी को भी सहा नही जायेगा… भ्रष्टाचाराला मी सहन करणार नाही आणि अशा लोकांना असा धाक लावेल की, अन्य कोणी असे करण्याचे धाडस करणार नाही. असे मोदीजी म्हणतात.’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.