मुंबई राजमुद्रा दर्पण। राज्यातील राजकीय वातावरण हे तापलेले दिसत आहेत. दरम्यान अनिल देशमुखांना रात्री उशीरा ईडीने अटक केली आहे. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी खळबळजनक आरोप केला आहे. अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंहांना ठाकरे सरकारनेच गायब केले असल्याचे ते म्हणाले आहेत. टीव्ही नाइन या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी हे भाष्य केले आहे.
परमबीर सिंह पळून गेले असले तरी त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना असेही शेलार म्हणाले. तसेच महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करत आहेत. परमबीर सिंह यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती असल्यामुळे सरकार पळायला मदत करत असल्याचा दावा शेलारांनी केला आहे.